Tula Fukaat Dilaya Lyrics – Anand Shinde | Bheem Geet

Tula Fukaat Dilaya Lyrics by Anand Shinde (भीमराव लई दिलदार Lyrics) is marathi song with music given by Harshad Shinde. Tula Fukaat Dilaya song lyrics are written by Sunil Khare.
Bheem Buddh Geet: Tula Fukaat Dilaya
Album Name: Eka Gharaat Ya Re
Singer: Anand Shinde
Composer: Harshad Shinde
Lyrics: Sunil Khare
Music Label: T-series

भीमराव लई दिलदार, तुला फुकट दिलया सार

“जमीन जुमला भला तो बंगला,
तुला केलया वारसदार,
होता भीमराव लई दिलदार,
तुला फुकट दिलया सार”

गावकुसाच्या बाहेर होतं तुझं मोडक तोडकं घरं,
ज्याला सोईचं नव्हतं दार, वर कचाट्याचं छप्पर (2)
गळ्यात मडकं पाठीला झाडु, फिरायचा दरोदार,
होता भीमराव लई दिलदार, तुला फुकट दिलया सार

नव्हतं जवळ बसत कोणी,नव्हतं मल्याच दीसत कोणी,
होता असून नसल्यावानी, नव्हतं तुला रं पुसत कोणी, (2)
भले भले ते झुकतात आजं ,
केलं तुला मतदार,होता भीमराव लई दिलदार तुला फुकट दिलया सार.

आता हातात आला फोन आणि दारात आली गाड़ी,
गाववेशीच्या बाहेर हाय का,
आता गावत बनली माड़ी,(2)
गळ्यात सोनं हातात सोनं,
तुझ्या बोटात अंगठ्या चार,
होता भीमराव लई दिलदार तुला फुकट दिलया सार.

खातों भिमाची तूप अन रोटी, नावं भलत्याचं घेतोय ओठी,
धन बापाचं बसलाय दाबून,
काय केलं तूसमाजसाठी(2)
बंगला हा सारा सुनिल समाज, आता बसना गड़ी गप् गारं,
होता भीमराव लई दिलदार तुला फुकट दिलया सार.

जमीन जुमला भला तो बंगला,
तुला केलया वारसदार,होता भीमराव लई दिलदार,
तुला फुकट दिलया सार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *